Latest

भावासाठी भाऊ आणि वडिलांसाठी मुलगा झाला देवदूत… लोणीत दोन किडनी प्रत्यारोपणची शस्त्रक्रिया यशस्वी !

अहिल्यानगरच्या लोणी येथून दोन शस्त्रक्रियांमधून नात्यांमधलं प्रेम आणि डॉक्टरांच्या कौशल्याची ताकद समोर आली आहे. प्रवरा ग्रामीण रुग्णालयात कुणी भावासाठी किडनी दिली, तर कुणी मुलासाठी ! नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण? सगळं सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

मंडळी, लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दोन किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. विशेष म्हणजे, या दोन्ही शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात आल्या. पहिल्या शस्त्रक्रियेत संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील ३० वर्षीय गणेश घुले यांना त्यांच्या धाकट्या भावाने, संतोष घुले यांनी किडनीदान केलं.

तर दुसऱ्या शस्त्रक्रियेत भिंगार येथील ४८ वर्षीय मोहम्मद अख्तर यांनी आपल्या २२ वर्षीय मुलाला, मोहम्मद अफजलला किडनी देऊन नवजीवन दिलं. रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने या दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या.

सध्या चारही जणांची प्रकृती समाधानकारक असून, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तुमच्या मते, संकटात नात्यांची खरी किंमत कळते का ? कमेंटमध्ये नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button