
तुमच्या नकळत तुमच्या नावावर कुणी दुसरं SIM कार्ड वापरत असेल, तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. त्यामुळे वेळेत तपासणी करणं महत्त्वाचं आहे. पण, तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत ? हे कसं तपासणार ? चला जाणून घेऊयात. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी, केंद्र सरकारच्या संचार साथी पोर्टलवरून तुम्ही तुमच्या नावावर नोंदणीकृत मोबाइल नंबर तपासू शकता. यासाठी सर्वप्रथम sancharsaathi.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. त्यानंतर TAFCOP हा पर्याय निवडा आणि तुमचा मोबाइल नंबर टाकून OTP द्वारे पडताळणी करा.
यानंतर तुमच्या नावावर नोंदणीकृत मोबाइल नंबरची यादी दिसेल. त्यामध्ये तुम्हाला माहीत नसलेला किंवा तुमचा नसलेला नंबर आढळल्यास, संबंधित पर्याय निवडून त्याची तक्रार नोंदवा. दूरसंचार विभागाकडून त्या तक्रारीची पडताळणी केली जाऊ शकते.
लक्षात ठेवा, सामान्यतः एका व्यक्तीच्या नावावर जास्तीत जास्त ९ सिम कार्डांची मर्यादा आहे; काही प्रदेशांत ती ६ आहे. तर मग मंडळी तुमच्याही नावावर एकापेक्षा अधिक सिम कार्ड आहेत का कमेंटमध्ये नक्की सांगा.





