
कल्पना करा, ज्या सापाच्या एका दंशाने माणसाचा जीव जाऊ शकतो, त्याच सापाच्या विषातील घटकांमुळे रक्तदाबावर औषध तयार झालं ! विज्ञानाचा हा चमत्कार नेमका कसा घडला ? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.
मंडळी, ही गोष्ट आहे ब्राझीलच्या जंगलात आढळणाऱ्या जाराराका या विषारी सापाची. १९६५ मध्ये सर्जिओ फरेरा या संशोधकाने त्याच्या विषावर अभ्यास सुरू केला.
या विषातील काही घटक रक्तवाहिन्या रुंद करून रक्तदाब कमी करण्यास मदत करतात, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर शास्त्रज्ञांनी अनेक वर्षे संशोधन आणि प्रयोग केले. या संशोधनातून १९८१ मध्ये अमेरिकेत कॅप्टोप्रिल या औषधाला मंजुरी मिळाली.
विशेष म्हणजे, याच शोधामुळे एनालाप्रिल आणि लिसिनोप्रिलसारख्या औषधांच्या विकासालाही मदत झाली. म्हणजेच निसर्गातलं विष संशोधनातून जीवनरक्षक औषधाचा आधार बनलं. तर मग मंडळी तुम्हाला आजचा हा विषय कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा.





