
अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदेंचं ‘योग्य घरात आलात’ हे जून विधान पुन्हा चर्चेत आलंय आणि कारण आहे सुजित झावरे यांची विधान परिषद निवडणुकीच्या रेसमध्ये असण्याची चर्चा !
मंडळी, अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीपूर्वी महायुतीत राजकीय हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. पारनेरचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष Sujit Zaware यांचं नाव आता Eknath Shinde यांच्या Shiv Sena कडून संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहे.
काही महिन्यांपूर्वी झावरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी “योग्य वेळी योग्य घरात आलात” असं सूचक विधान केलं होतं.
आता त्याच विधानाची पुन्हा चर्चा रंगली आहे. अहिल्यानगरमध्ये पारंपरिकरित्या ही जागा राष्ट्रवादीकडे राहिली असली, तरी भाजप, अजित पवार गट आणि शिंदे शिवसेना यांच्यात मोठी रस्सीखेच सुरू आहे.
शिंदे गटाला जिल्ह्यात अपेक्षित यश मिळालं नसतानाही, आता विधान परिषद निवडणुकीत सुजित झावरे यांना किती ताकद मिळते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.





