Latest

काय सांगता ! बीपीएल ग्राहकांना अवघ्या अडीच हजारांत सोलर,लाईट बिल झिरो

काय सांगताय ! आता बीपीएल ग्राहकांना अवघ्या अडीच हजार रुपयांत घरावर सोलर प्रणाली बसवता येणार आहे आणि उर्वरित तब्बल 47 हजार 500 रुपये सरकार देणार आहे.

महावितरणमार्फत राबवण्यात येणाऱ्या या योजनेत 1 किलोवॅट सोलर प्रणालीची किंमत साधारण 50 हजार रुपये आहे. पण यामध्ये केंद्र सरकारकडून 30 हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. त्यासोबत राज्य सरकारकडूनही अतिरिक्त आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे.

सर्वात मोठी गोष्ट म्हणजे बीपीएल ग्राहकांना फक्त अडीच हजार रुपये भरावे लागणार आहेत. उर्वरित रक्कम शासन अनुदानातून दिली जाणार आहे.

अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील ग्राहकांना केवळ 5 हजार रुपये भरावे लागतील, तर सामान्य प्रवर्गातील ग्राहकांनाही फक्त 10 हजार रुपयांत ही सोलर प्रणाली बसवता येणार आहे. अतिरिक्त वीज महावितरणला विकून उत्पन्न मिळवण्याचाही पर्याय ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.

मात्र, या योजनेसाठी काही अटी देखील आहेत. मागील वर्षभरातील वीज वापर 100 युनिटपर्यंत किंवा त्यापेक्षा कमी असावा, सिंगल फेज वीज जोडणी असावी आणि ग्राहकाच्या नावावर कोणतीही थकबाकी नसावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button