Latest

पेट्रोल-डिझेलसोबत सोन्याचे दरही भडकले ! नेमकं कारण काय ?

“महागाईचा आणखी एक धक्का! पेट्रोल-डिझेलनंतर आता सोन्याचे दरही झपाट्याने वाढले आहेत.” देशभरात आज पुन्हा एकदा इंधन दरवाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात 2.61 रुपये, तर डिझेलमध्ये 2.71 रुपयांची वाढ केली.

गेल्या 11 दिवसांतील ही चौथी वाढ असल्याने सामान्य नागरिकांचे बजेट पुन्हा कोलमडण्याची शक्यता आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतींमध्येही मोठी तेजी पाहायला मिळाली.

अनेक आठवड्यांच्या चढ-उतारानंतर सोन्याचा भाव प्रति औंस 4560 डॉलरच्या पुढे गेला. चांदीच्या किमतीतही जवळपास 4 टक्क्यांची वाढ झाली आहे.

तज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी होण्याच्या बातम्या, होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याची शक्यता आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण यामुळे बाजारात मोठा बदल झाला आहे. याचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसू शकतो. आता एमसीएक्सवर सोन्या-चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button