Latest

रिक्षाला फक्त 3 चाकंच का असतात ? कारण ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल !

शहराच्या रस्त्यांवर रोज दिसणाऱ्या ऑटो रिक्षाला चारऐवजी तीनच चाकं का असतात ? तुम्हाला माहितीये का? तर मंडळी, यामागे केवळ वेगळं डिझाइन नाही, तर अनेक व्यावहारिक कारणं आहेत.

रिक्षाची रचना प्रामुख्याने अरुंद आणि गर्दीच्या रस्त्यांसाठी करण्यात आली आहे. तीन चाकांमुळे कमी जागेत रिक्षा सहज वळवता येते आणि छोट्या गल्लीबोळातूनही मार्ग काढता येतो.

याशिवाय, चार चाकांच्या वाहनांच्या तुलनेत तीन चाकी वाहनासाठी साहित्य कमी लागतं. त्यामुळे उत्पादन आणि देखभालीचा खर्च तुलनेने कमी राहतो. वजन कमी असल्याने इंजिनवरही कमी भार पडतो आणि इंधनाची बचत होण्यास मदत होते.

म्हणूनच रिक्षा शहरातील प्रवासासाठी स्वस्त आणि सोयीचा पर्याय ठरते. मात्र, तीन चाकांमुळे वेगात अचानक वळण घेताना स्थिरता कमी होऊ शकते. त्यामुळे रिक्षा चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणं आणि सुरक्षिततेची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button