
कष्टाने कमावलेले पैसे सुरक्षितही ठेवायचे आणि त्यावर चांगला परतावाही मिळवायचा असेल, तर FD हा अनेकांसाठी विश्वासाचा पर्याय ठरतो. SBIची ‘अमृत वृष्टी’ ही 444 दिवसांची विशेष FD योजना सध्या चर्चेत आहे.
या योजनेत 2 लाखांची गुंतवणूक केल्यास सामान्य नागरिकांना 6.45 टक्के वार्षिक व्याजदर मिळतो. 444 दिवसांची मुदत पूर्ण झाल्यानंतर व्याजासह अंदाजे 2 लाख 16 हजार 189 रुपये मिळतात.
ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर अधिक आहे. 60 वर्षांवरील नागरिकांना 6.95 टक्के दराने सुमारे 17,486 व्याज मिळून एकूण 2 लाख 17 हजार 486 रुपये मिळतात.
तर 80 वर्षांवरील अति-ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.05 टक्के व्याजदर असून, 17,746 व्याजासह एकूण 2 लाख 17 हजार 746 रुपये मिळू शकतात. मात्र FD करण्यापूर्वी बँकेच्या ताज्या नियमांनुसार व्याजदर, कर आणि मुदतपूर्व पैसे काढण्याच्या अटी नक्की तपासा.





