
अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आजचा दिवस निर्णायक ठरणार आहे… कारण सात जागांवरचा तिढा अजूनही कायम आहे!
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी अर्ज दाखल करण्याचा आज अंतिम दिवस आहे. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीच्या प्रयत्नांना आज अंतिम स्वरूप मिळण्याची शक्यता आहे.
सर्वसाधारण मतदारसंघातील सात जागांवर विखे पाटील आणि थोरात गटाकडून जोरदार दावे केले जात आहेत. दोन्ही बाजूंना चार-चार जागा हव्या असल्याची चर्चा असून, सभापती राम शिंदे यांच्यासाठीही जागा राखण्याची मागणी आहे.
या सगळ्या समीकरणात आमदार संग्राम जगताप यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. बंधू सचिन जगताप यांना बिगरशेती मतदारसंघातून संधी मिळावी, यासाठी ते प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे.
अकोले, पारनेर, श्रीगोंदा, पाथर्डी आणि नगर तालुक्यातही उमेदवारीवरून पेच कायम आहे. त्यामुळे आज अर्ज दाखल झाल्यानंतर सात जागांचा तिढा सुटतो की जिल्हा बँकेत प्रत्यक्ष राजकीय लढत रंगते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.





