Latest

निवडणुक आयोगाचे बॉस ज्ञानेश कुमार कोण आहेत ? त्यांच्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त कोण ? पहा…

फेब्रुवारी 2025 मध्ये ज्ञानेश कुमार यांनी देशाचे 26 वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. सध्या मतदार यादीच्या शुद्धीकरणासाठी सुरू असलेल्या SIR प्रक्रियेतील काही निर्णयांवरून ते चर्चेत आहेत.

विरोधकांनी त्यांच्यावर बेइमानी केल्याचा आरोप करत त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी उपस्थिती केली आहे. एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेनुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या 10 महिन्यांत 14 वेळा ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयांना विरोध केलाय.

माहिती न देता निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात आला, मात्र ज्ञानेश कुमार यांनी हे आरोप फेटाळले आहेत. याआधी राहुल गांधी यांनी त्यांच्यावर ‘व्होट चोरी’चा आरोप केला होता. त्यावर ज्ञानेश कुमार यांनी आरोप सिद्ध करण्याचे किंवा माफी मागण्याचे आव्हान दिले होते.

ज्ञानेश कुमार हे 1988 बॅचचे आयएएस अधिकारी असून त्यांनी IIT कानपूर आणि हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेतले आहे. गृह, संरक्षण, संसदीय कार्य आणि सहकारिता मंत्रालयात त्यांनी काम केले आहे. त्यांचा कार्यकाळ 26 जानेवारी 2029 रोजी संपणार आहे. त्यांच्या नंतर विवेक जोशी मुख्य निवडणूक आयुक्त होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button