
अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक लागल्यानंतर ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाखांनी दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक बिनविरोध करण्याची साद घातली. त्याला सर्वप्रथम पालकमंत्री राधाकृष्ण विखे व बाळासाहेब थोरातांनी होकार दर्शवला.
हे दोन्ही दिग्गज एकत्र आले. त्यानंतर सर्वप्रथम नेवाशातून शंकरराव गडाख, संगमनेरमधून रणजीतसिंह देशमुख, राहात्यातून डॉ. सुजय विखे पाटील, श्रीरामपूरमधून करण ससाणे, पाथर्डीतून आमदार मोनिका राजळे, शेवगावमधून राजश्री घुले पाटील, नगरमधून अक्षय कर्डिले, कोपरगावमधून आ. विवेक कोल्हे, हे नेते सुरुवातीलाच बिनविरोध झाले.
अर्ज माघारीच्या शेवटच्या क्षणापर्यंत बिगरशेती मतदारसंघातून सचिन जगताप, श्रीगोंदा सोसायटी मतदारसंघातून दत्तात्रय पानसरे, जामखेड सोसायटी मतदारसंघातून सचिन घुमरे हे बिनविरोध झाले. आता उरलेल्या १० जागांसाठी लढत रंगणार आहे. परंतु सुरुवातीलाच ११ जागा बिनविरोध झाल्याने बँकेवर विखे-थोरातांचीच सत्ता आल्याचे स्पष्ट झाले आहे.





