Latest

विखे-थोरातांनी ‘अशी’ जुळवली जिल्हा बँकेची गोळाबेरीज… आता उर्वरीत लढती कशा? पहा…

अहिल्यानगर जिल्हा बँकेवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांना सत्ता मिळवण्यात यश आलं. २१ जागांपैकी ११ जागा बिनविरोध झाल्या. बुधवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. अखेर १० जागांसाठी निवडणूक लागली.

त्यात पारनेर सोसायटी मतदारसंघात राहुल शिंदे विरुद्ध खा. निलेश लंके, राहुरी सोसायटी मतदारसंघात आ. प्राजक्त तनपुरे विरुद्ध सत्यजित कदम, कर्जत सोसायटी मतदारसंघात तुषार पिसाळ विरुद्ध ज्योती शिंदे, अकोले सोसायटी मतदारसंघात संजीवनी शिंदे विरुद्ध आ. किरण लहामटे, शेतीपूरक मतदारसंघात आ. आशुतोष काळे विरुद्ध सुधीर म्हस्के, इतर मागासवर्ग मतदारसंघ काशिनाथ जावळे विरुद्ध आजिनाथ हजारे, भटक्या विमुक्त जामाती मतदारसंघात गणपत सांगळे विरुद्ध ऋषिकेश ढाकणे, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघात वैभव पिचड विरुद्ध प्रशांत लोखंडे, याशिवाय महिला राखीव दोन जागांसाठी संगीता वाघ, अनुराधा नागवडे, मंजुषा गुंड, हर्षदा काकडे, सुप्रिया झावरे अशी लढत रंगणार आहे. त्यातील अनेक जागांवर विखे-थोरातांच्याच कार्यकर्त्यांत लढत असल्याने जिल्हा बँकेवर त्यांचंच निर्विवाद वर्चस्व राहिल, असं सागितलं जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button