
सोन्याच्या भाव वाढीचा फुगा लवकरच फुटणार आणि या मौल्यवान धातूच्या किमती एक लाख रुपये प्रति दहा ग्रॅम पर्यंत खाली येणार असा एक अंदाज समोर आला आहे. पण सोन्याच्या किमती कमी होण्याचे कारण काय? सगळं सांगतो आधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी, बँक ऑफ अमेरिकेच्या अंदाजानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव घसरून ३,७०० डॉलर प्रति औंसपर्यंत येऊ शकतो. भारतीय चलनात हा दर अंदाजे १ लाख १२ हजार रुपये प्रति १० ग्रॅमच्या आसपास ठरतो.
बँकेच्या विश्लेषणानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव ३,२५० डॉलरपर्यंत घसरल्यास भारतीय चलनातील अंदाजे किंमत ९८ हजार रुपयांच्या आसपास असू शकते.
डॉलरची वाढती ताकद आणि सोन्यातील दीर्घ तेजीमुळे सुरू असलेली घसरण ही यामागची संभाव्य कारणं आहेत. मात्र, हे केवळ बाजारातील अंदाज आहेत; निश्चित भाव नाहीत.
भारतातील प्रत्यक्ष दर रुपयाचा विनिमय दर, आयात शुल्क आणि इतर खर्चांमुळे बदलू शकतात. तुमच्या मते सोनं लाखाच्या खाली येईल का? कमेंट करून नक्की सांगा!





