Latest

पांढरं मीठ की सैंधव….; आरोग्यासाठी नेमकं कोणतं योग्य ? सत्य जाणून घ्या !

सैंधव मीठ म्हणजे पांढऱ्या मिठापेक्षा नेहमीच आरोग्यदायी, असा समज अनेकांमध्ये आहे. पण तज्ज्ञांच्या मते या दोन्ही मिठांमध्ये सोडियमचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे मीठ कोणतं वापरतो यापेक्षा ते किती प्रमाणात खातो, हे अधिक महत्त्वाचं आहे.

रोजच्या आहारासाठी आयोडीनयुक्त मीठ वापरण्याचा सल्ला दिला जातो. कारण शरीराला थायरॉइड ग्रंथीच्या योग्य कार्यासाठी आयोडीन आवश्यक असते. सैंधव मिठामध्ये नैसर्गिक आयोडीन नसते.

जास्त मीठ खाल्ल्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढू शकतो. त्यातून हृदयविकार, पक्षाघात आणि मूत्रपिंडाशी संबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसीनुसार प्रौढ व्यक्तीने दिवसाला पाच ग्रॅमपेक्षा म्हणजेच साधारण एक चमच्यापेक्षा कमी मीठ घ्यावे.
म्हणून सैंधव मीठ नैसर्गिक आहे म्हणून ते अमर्याद वापरणे योग्य नाही. रोजच्या स्वयंपाकात आयोडीनयुक्त मीठ निवडा आणि प्रमाणावर नियंत्रण ठेवा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button