Explained

जगातील सर्वात धुरंधर गुप्तचर संस्था कोणती? एकदा टार्गेट ठरवलं की, विषय संपला…

धुरंधरने सगळेच विक्रम मोडलेत. या चित्रपटाने भारतीय मनोरंजन क्षेत्रात एक वेगळाच दबदबा निर्माण केला. चित्रपटात दाखविल्याप्रमाणे भारताने भारताच्या शत्रूंचा खरंच पाकिस्तानमध्ये जाऊन खात्मा केला का? तर हो केला… राॅ या भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या सदस्यांनी आपल्या देशाच्या शत्रूंना चुन चून के संपवलंय… आता या चित्रपटानंतर गुप्तहेर खातं का महत्त्वाचं असतं, याच्या चर्चा सुरु झाल्या. भारताचा प्राचीन इतिहास पाहिला तर अगदी आर्य चाणक्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंतच्या अनेक सम्राटांच्या कार्यकाळात राजांच्या पदरी गुप्तहेर असल्याचे दाखले मिळतात.

छत्रपती शिवाजी महाराजांचे, गनिमी कावे ही बहिर्जी नाईक यांच्यामुळेच यशस्वी झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे या गुप्तचर संस्था किंवा गुप्तहेर खाते हे प्रत्येक देशासाठी किती महत्त्वाचे आहे, हे समजते. आज जवळपास सर्वच देशांकडे त्यांच्या गुप्तचर संघटना अथवा संस्था आहेत. त्याबद्दल लोकांना कुतूहल, आदर, दरारा, भीती, तिरस्कार, अशा विविध भावना असतात. मग हाच विषय पाहिला तर जगातील सर्वात डेन्जर गुप्तचर संस्था कोणती?

देश कोणताही असो, देश म्हटला की शत्रू आलाच. मग या शत्रूचा बिमोड करायचा, तर प्रत्येकवेळी युद्ध करणं किंवा थेट हवाई हल्ले करणं शक्य नसतं. अनेकदा शत्रूंना संपविण्याच्या कारवाया अगदी सामान्य पद्धतीनं कराव्या लागतात. मग अशा वेळी प्रत्येक देशाकडं काही गुप्तहेर असावे लागतात. एखादी गुप्तहेर संस्था असावी लागते. याच गुप्तहेर संस्था किंवा त्यातील कर्मचारी, हे आपल्या सरकारने सांगितलेल्या शत्रूंचा खात्मा करण्याचं काम करतात. गुप्तहेरांची संस्था किंवा गुप्तहेर हा प्रकार नवा नाही. भारतातही अगदी प्राचीन युगापासून तो चालत आलाय. भारतातील प्रत्येक राजाकडे आपापले गुप्तहेर होते. अगदीच अलिकडच्या काळाचा आभ्यास केला तरी, छत्रपती शिवाजी महाराजांकडेही बहिर्जी नाईक यांच्याकडे गुप्तहेर खातं होतं.

महाराजांच्या अनेक लढाया याच गु्प्तहेर खात्यामुळे यशस्वी झाल्यात. सूरत लुट किंवा अफजलखानाचा वध या दोन्ही मोहिमा याच बहिर्जी नाईकांच्या हेरगिरीमुळे पुर्णत्वास गेल्या. कालांतराने याच गुप्तहेर खात्याला विशेष महत्व येत गेलं. जग जसंजसं प्रगतीकडे वाटचाल करत गेलं, तसतसे प्रत्येक देशाचे शत्रूही वाढले. त्यातून साम्राज्यवाद, वर्चस्ववाद वाढला. त्यामुळे गुप्तहेर खात्याला वजन प्राप्त झालं. गुप्तहेर खातं हे देशाची किंवा राज्याची सुरक्षा करण्यासाठी महत्त्वाचं ठरू लागलं. देशात स्थैर्य, सार्वभौमत्व टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत गोपनिय व महत्त्वाची माहिती गोळा करण्याचं काम या खात्यावर सोपविण्यात आलं. शत्रूंची माहिती मिळवणं, राष्ट्रीय सुरक्षेचे संरक्षण करणं, गुप्त मोहिमा आखणं, त्या यशस्वी करणं, अंतर्गत व बाह्य सुरक्षा सांभाळणं, माहितीचं विश्लेषण काढणं, अशी अनेक महत्त्वाची कामे या गुप्तचर संस्थेकडे सोपविण्यात आली.

आता जगाचा विचार केला तर अमेरिकेचे सीआयए, इस्त्रायलची मोसाद, भारताची राँ, ब्रिटनची एमआय-6, पाकिस्तानची आयएसआय, सोव्हियत युनियनची केजीबी, चीनची एमएसएस, अशा काही गुप्तचर संस्था प्रसिद्ध आहेत. त्यातही इस्त्रायलची मोसाद ही सर्वात खतरनाक संस्था म्हणून ओळखली जाते. भारताची राँ ही एजन्सीही काही कमी नाही. भारताच्या या संस्थेने आत्तापर्यंत वेगवेगळ्या देशात तब्बल 100 पेक्षा जास्त मोहिमा यशस्वी केल्याचं सांगितलं जातं. जगात ज्या काही टाँप-5 गुप्तहेर संस्था आहेत, त्यात मोसाद ही सर्वात खतरनाक समजली जाते. मोसाद ही 7 हजार कर्मचारी असलेली ही जगातील सर्वात मोठी गुप्तचर संस्था आहे. मोसादने जगभरात असंख्य ऑपरेशन राबवले आहेत. ज्याच्या मदतीने त्यांना शत्रू संपवले आहेत. जगातील टाँप-5 संस्था कोणत्या व त्या कसं काम करतात, हेच आपण थोडक्यात पाहू…

पहिली आहे RAW म्हणजेच Research and Analysis Wing

१९६५ चं भारत-पाकिस्तान युद्ध २२ दिवस चाललं. या युद्धात भारताचा विजय झाला असला तरी, भारताची अंतर्गत गुप्तचर संस्था इंटेलिजेंस ब्युरो त्यावेळी अपयशी ठरली, असं म्हटलं गेलं. पाकिस्तानमधील परिस्थिती योग्य माहिती आयबी नं काढली असतील तर या यु्द्धाचा निकाल यापेक्षा वेगळा लागला असता, असं बोललं गेलं. हे अपयश लक्षात घेऊन, भारताने देशाबाहेरून गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी एक नवीन एजन्सी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. ही गुप्तचर संस्था २१ सप्टेंबर १९६८ रोजी स्थापन झाली. तिचे नाव रिसर्च अँड अॅनालिसिस विंग म्हणजेच RAW. रामेश्वरनाथ काव यांना RAW चे पहिले प्रमुख बनवण्यात आलं. शंकरन नायर यांना दुसरी जबाबदारी देण्यात आली. तसेच, ही एजन्सी आयबीमधून सुमारे २५० लोकांना रॉमध्ये स्थानांतरित करून सुरू करण्यात आली. आज हीच राँ, जगातील एक प्रमुख गुप्तचर संस्थांपैकी एक बनली आहे.

दुसरी आहे, अमेरिकेची CIA म्हणजे Central Intelligence Agency

जगातील सर्वात प्रसिद्ध गुप्तचर संस्था म्हणून ओळखली जाणारी अमेरिकेची सेंट्रल इंटेलिजेंस एजन्सी, सीआयए दुसऱ्या महायुद्धाच्या काळात उदयास आली. ११ जुलै १९४१ रोजी अध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांनी ‘माहिती समन्वयक कार्यालय’ स्थापन केले, तर १३ जून १९४२ रोजी ‘ऑफिस ऑफ स्ट्रॅटेजिक सर्व्हिसेस’ ही केंद्रीकृत गुप्तचर संस्था उभारली. युद्धानंतर १९४५ मध्ये अध्यक्ष हॅरी एस. ट्रुमन यांनी ओएसएस बरखास्त केली आणि तिच्या काही विभागांना एकत्र करून ‘स्ट्रॅटेजिक सर्व्हिसेस युनिट’ स्थापन केले. त्यानंतर २२ जानेवारी १९४६ रोजी ‘सेंट्रल इंटेलिजेंस ग्रुप’ (CIG) तयार झाला. अखेर १८ सप्टेंबर १९४७ रोजी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये ‘सीआयए’ची स्थापना झाली. ही संस्था स्वतंत्र नागरी गुप्तचर संस्था म्हणून कार्यरत आहे.

तिसरी आहे, इस्त्रायलची MOSSAD

इस्रायलची गुप्तचर संस्था ‘मोसाद’ ही जगातील सर्वात कुशल आणि आदरनीय गुप्तचर संस्थांपैकी एक मानली जाते. इस्रायलच्या सुरक्षेसाठी जगभरातील कोणत्याही शत्रूंना शोधून नष्ट करण्याची क्षमता या संस्थेत आहे. मोसादच्या हिटलिस्टमध्ये जो आहे, तो जगणं अशक्य मानलं जातं. इस्रायलच्या स्थापनेनंतर पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन यांना लष्करी आणि इतर सुरक्षा यंत्रणांमध्ये समन्वय साधणाऱ्या एका स्वतंत्र गुप्तचर संस्थेची गरज भासली. त्यातूनच १३ डिसेंबर १९४९ रोजी मोसादची स्थापना झाली. रुवेन शिलोह हे संस्थेचे पहिले संचालक बनले. ‘मोसाद ले-मोदी’इन उले-तफकिदीम मेयुहादिम’ हे तिचे पूर्ण नाव असून, इंग्रजीत ती ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर इंटेलिजेंस अँड स्पेशल ऑपरेशन्स’ म्हणून ओळखली जाते. संस्थेचे मुख्यालय तेल अवीव येथे आहे.

चौथी आहे ब्रिटनची SIS म्हणजेच Secret Intelligence Service

ब्रिटनची गुप्तचर संस्था ‘सीक्रेट इंटेलिजेंस सर्व्हिस’ हीच ‘MI-6’ म्हणून ओळखली जाते. तिची स्थापना १९०९ मध्ये, पहिल्या महायुद्धाच्या आधी, देशाबाहेरून गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी ‘गुप्त सेवा ब्युरो’ म्हणून झाली. सुरुवातीला यामध्ये नौदल आणि सैन्य अशा दोन शाखा होत्या, पण लवकरच ती बाह्य आणि अंतर्गत गुप्तचर विभागांत विभागली गेली. १९११ मध्ये या संस्थेला औपचारिक मान्यता मिळाली आणि १९१६ मध्ये लष्करी गुप्तचर संचालनालयाच्या अंतर्गत दोन्ही विभागांना ‘एमआय’ म्हणजेच मिलिटरी इंटेलिजेंस असं नाव देण्यात आलं. सध्या ब्रिटनमध्ये ‘MI5’ ही संस्था देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी जबाबदार असून, ‘MI6’ म्हणजेच SIS ही आंतरराष्ट्रीय गुप्तचर कार्यासाठी कार्यरत आहे.

पाचवी आहे पाकिस्तानची ISI म्हणजेच Inter-Services Intelligence

पाकिस्तानची बाह्य गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ भारतापेक्षा जुनी असून, तिची स्थापना १९४८ मध्ये इंग्रज अधिकारी रॉबर्ट कॉथॉम यांनी केली. ही संस्था जगभरात आपल्या कारवायांमुळे बदनाम आहे. आयएसआयवर तालिबानसह अनेक दहशतवादी गटांना मदत केल्याचे आरोप असून, जागतिक स्तरावर दहशतवाद पसरवण्यात तिची भूमिका असल्याचे मानले जाते.

या टाँप-5 संस्थांमध्ये मोसादची दहशत मात्र अजूनही कायम आहे. जगातील सर्वात धोकादायक आणि प्रभावशाली गुप्तचर संस्था मानली जाणारी मोसाद ही इस्रायलची राष्ट्रीय गुप्तचर संस्था आहे. ही एजन्सी अत्यंत गुप्तता, साहसी मोहिमा आणि प्राणघातक ऑपरेशन्ससाठी ओळखली जाते. या संस्थेतील महिला एजंटही इतक्या खतरनाक आहेत की त्या सौंदर्याच्या व प्रचंड आत्मविश्वासाच्या जोरावर काहीही शक्य करु शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button