
राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे एका २८ वर्षीय विवाहित तरुणीला मारहाण करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
३० सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अक्षय मोकाटे याने तरुणीला तिच्या पतीवरून शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
इतकेच नाही, तर साडीचा पदर ओढून विनयभंग केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या झटापटीत तरुणीचा मोबाईल फोडून नुकसान केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
भांडण सोडवण्यासाठी पुढे आलेल्या तिच्या मुलांनाही शिवीगाळ आणि दमदाटी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून अक्षय कैलास मोकाटे, दत्तू शंकर मोकाटे आणि सागर दत्तू मोकाटे या तिघांविरुद्ध राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत.





