
पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे ! आणि आता याच प्रोत्साहन अनुदानाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. काय आहे नवीन अपडेट? सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी, राज्य सरकारच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी शेतकऱ्यांची माहिती मागवण्यात आली असून, तपासणी आणि ऑडिटनंतर पात्र याद्या शासनाकडे पाठवल्या जाणार आहेत.
या अनुदानासाठी २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांत पीक कर्ज घेऊन विहित मुदतीत परतफेड केलेली असणं आवश्यक आहे.
२०२५-२६ मध्ये अल्पमुदतीचं पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत परतफेड केलेली असावी. मागील ऊस हंगामातील कर्जफेडीसाठी काही शेतकऱ्यांना जून २०२७ पर्यंत मुदत आहे. मात्र, पात्रता आणि लाभाची अंतिम खात्री अधिकृत शासन निर्णयातून करून घ्या. तुम्ही नियमित कर्जफेड केली आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा.





