
पुणे-अहिल्यानगर महामार्गावर पुन्हा एकदा एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. चास शिवारात ७ सप्टेंबरला सायंकाळी एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली. या दुर्दैवी अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
प्रकाश शंकर वैद्य (वय ३० वर्षे) आणि रुक्मी संतोष वैद्य (वय २५ वर्षे) अशी या अपघातात जीव गमावलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघेही दुचाकीवरून जात असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली.
या अपघातानंतर उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेला ट्रकचालक सलमान अहमद इलियास हुसेन याला पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले आहे.
मृताचे भाऊ विकास शंकर वैद्य यांनी याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.





