
आमदार रोहित पवार शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये जाणार..? नागपुरात भाजप आमदार परिणय फुके यांनी केलेल्या एका दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडालीये. विदर्भातील भाजप आमदार परिणय फुके यांनी मोठा दावा केलाय, की रोहित पवारांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची गुप्त भेट घेतली आहे.
इतकंच नाही, तर रोहित पवार हे लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावाही फुकेंनी केलाय.पण पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर असलेल्या रोहित पवारांनी या दाव्यावर अत्यंत आक्रमक पलटवार केला. रोहित पवार म्हणाले की, फुकेंसारख्या नेत्यांकडे कोणतीही ठोस माहिती नसते. ते फक्त प्रसिद्धीसाठी असली वक्तव्यं करतात.
रोहित पवारांनी थेट धान खरेदी आणि वाळू तस्करीच्या मुद्द्यावरून भाजपवर आणि परिणय फुकेंवर निशाणा साधला. गेल्या काही दिवसांपासून रोहित पवारांची काँग्रेसशी जवळीक वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय.
पण रोहित पवारांनी फुके यांचा हा दावा पूर्णपणे फेटाळून लावत त्यांना आपल्या मतदारसंघात लक्ष देण्याचा सल्ला दिलाय.





