Latest

हवामानाचा मूड बदलला ! अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली…..; राज्यातील ‘या’ ९ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. मात्र, आता हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांसाठी पावसाचा अंदाज दिला आहे.

अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेडमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तर राज्यातील इतर भागांत प्रामुख्याने ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी हलक्या सरी येऊ शकतात. पावसाची उघडीप असल्याने कमाल तापमानातही वाढ झाली आहे.

मागील २४ तासांत सोलापूरमध्ये राज्यातील सर्वाधिक ३६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर महाबळेश्वरमध्ये १७.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.

दरम्यान, बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्याने आगामी काळात हवामानात आणखी बदल होण्याचे संकेत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button