Latest

देशभरातील मेडिकल दुकानांसाठी सरकारचा नवा नियम….! आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध घेतल्यास काय होणार ?

औषध दुकानातून प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध घेताय? आता नियम आणखी कडक होण्याची शक्यता आहे ! मंडळी, केंद्र सरकारने औषध विक्रीवर अधिक नियंत्रण आणण्यासाठी महत्त्वाचा प्रस्ताव मांडला आहे. यानुसार देशातील औषध दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक केले जाऊ शकते.

विशेषतः शेड्युल एच, एच१ आणि एक्स श्रेणीतील औषधांची डॉक्टरांच्या वैध प्रिस्क्रिप्शनशिवाय होणारी विक्री रोखणे हा या प्रस्तावामागचा मुख्य उद्देश आहे.

या नियमामुळे संवेदनशील औषधांच्या विक्रीवर अधिक बारकाईने लक्ष ठेवता येणार आहे. औषधांची बेकायदेशीर खरेदी-विक्री, गैरवापर आणि अनधिकृत वितरणाला आळा घालण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

या प्रस्तावावर औषध सल्लागार समिती आणि औषध तांत्रिक सल्लागार मंडळात चर्चा झाली असून, डीटीएबीने प्रस्तावाला मंजुरी देण्याची शिफारस केली आहे.

मात्र हा अजून अंतिम नियम झालेला नाही. आरोग्य मंत्रालयाने मसुदा प्रसिद्ध करून औषध क्षेत्रातील संबंधित घटक आणि नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या आहेत. म्हणजेच, औषध दुकानांवर सीसीटीव्हीची नजर येणार का? याबाबतचा अंतिम निर्णय आता सरकारच्या पुढील प्रक्रियेनंतर स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button