
अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अशी राजकीय खेळी झालीय, ज्यामुळे जिल्ह्यातल्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय ! नेमक पडद्यामागे काय सुरु आहे. सांगतो. पण आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी, २१ जागांपैकी ११ जागा बिनविरोध करत सुजय विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांनी सहकारातली आपली ताकद दाखवून दिली. पण खरी लढाई अजून बाकी आहे. उर्वरित १० जागांसाठी २७ उमेदवार मैदानात आहेत.
खासदार नीलेश लंके यांना बँकेत आपलं राजकीय वजन सिद्ध करायचंय, तर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासमोर सहकारात स्वतंत्र ताकद उभी करण्याचं आव्हान आहे.
दुसरीकडे, सुजय विखेंनी थोरातांना सोबत घेत बिनविरोध निवडणुकीचा मार्ग काढला. त्यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेण्याचा प्रयत्नही झाला, मात्र न्यायालयाने त्यांना निवडणुकीसाठी हिरवा कंदील दिला.
आता या दहा जागांचा निकाल आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची समीकरणंही बदलू शकतो. तुमच्या मते, जिल्हा बँकेच्या राजकारणात कोण बाजी मारणार? कमेंट करून नक्की सांगा.





