Latest

शेवटी आईच काळीज….१० वर्षाच्या मुलीला वाचवण्यासाठी आई बिबट्याला नडली, पारनेरमध्ये दिसला बिबट्याचा थरार !

पारनेर शहरातील जामगाव रस्त्यावरील औटी वस्तीवर सायंकाळच्या वेळी काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. शेतात आईसोबत गेलेल्या पाचवीत शिकणाऱ्या दहा वर्षीय श्रुती नीलेश औटीवर अचानक बिबट्याने झडप घातली.

काही क्षणांतच बिबट्याने श्रुतीला आपल्या तावडीत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आईने घाबरून न जाता आरडाओरड करत बिबट्याचा प्रतिकार केला. तिचा आवाज ऐकून जवळील शेतकरी आणि नातेवाईक मदतीसाठी धावून आले.

लोकांची चाहूल लागताच बिबट्याने तेथून पळ काढला आणि श्रुतीचा जीव थोडक्यात बचावला. या हल्ल्यात तिच्या पायाला बिबट्याच्या पंजामुळे जखम झाली असून, तिला पारनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

डॉक्टरांनी तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. दरम्यान, वन विभागाने घटनास्थळी पाहणी करून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

भारनियमनामुळे संध्याकाळी अंधाराचा फायदा घेत बिबटे वस्तीजवळ येत असल्याची नागरिकांची तक्रार असून, भारनियमन बंद करण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button