Latest

बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या युवकाचा दुर्दैवी अंत ! पोस्टमार्टममधून समोर आल धक्कादायक सत्य; अहिल्यानगरमध्ये खळबळ, नेमक काय घडलं ?

अहिल्यानगरच्या पांगरमल शिवारात बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या सागर महादेव ऊरुडे या तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. शवविच्छेदन अहवालातून सागरचा खून झाल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक शिरीष वमने यांनी दिली.

सागर ऊरुडे हा दातरंगेमळा, नालेगाव येथील रहिवासी होता. त्याच्या मृत्यूस जबाबदार व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी सागरचा मृतदेह घेऊन एमआयडीसी पोलिस ठाणे गाठले.

या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. मात्र, सागरच्या नातेवाईकांनी आणखी एका व्यक्तीवर संशय व्यक्त केला असून, त्या व्यक्तीचे नाव फिर्यादीत नमूद करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

नातेवाईक आणि पोलिसांमध्ये चर्चा सुरू असून, त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नव्हता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button