
हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर एका तरुणाचा मृतदेह शोधायला गेलेल्या रेस्क्यू टीमला असं काही सापडलं, की सगळेच चक्रावले. या ८०० फूट खोल दरीत एक मृतदेह आणि त्याच ठिकाणी दुसऱ्या तरुणाचा सांगाडाही आढळला. नेमक काय आहे संपूर्ण प्रकरण? सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी, अहिल्यानगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगडावर ही घटना घडलीय. गुजरातमधील २३ वर्षीय विश्वराजसिंह गोईल बेपत्ता होता. १२ ऑक्टोबरला त्याने कुटुंबीयांना आत्महत्येचा व्हिडिओ पाठवला होता. त्यानंतर कोकणकड्यावर त्याची बॅग, मोबाईल आणि चावी, तर पायथ्याशी मोटारसायकल आढळली.
१४ ऑक्टोबरला शोध घेताना दरीत एक मृतदेह दिसला. त्यानंतर लोणावळा अॅडव्हेंचर ट्रेकर्सच्या टीमने दोरीच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. पण मृतदेहासोबत त्यांना एक जीर्ण झालेला सांगाडाही सापडला.
जवळ असलेल्या मोबाईलवरून हा सांगाडा पुणे जिल्ह्यातील २६ वर्षीय गणेश सोनारचा असल्याचं समोर आलं. तो जुलै महिन्यापासून बेपत्ता होता. कोकणकडा खरच आत्महत्येचे केंद्र बनतय का? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.





