Latest

श्रीक्षेत्र भगवानगडावर मोठा बदल… २२ वर्षांची परंपरा सांभाळल्यानंतर निवृत्ती, नामदेव शास्त्री आता पुढे काय करणार ?

भगवानगडाच्या गादीवर आता नवे महंत विराजमान झाले आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर कृष्णा महाराज शास्त्री यांनी भगवानगडाच्या चतुर्थ महंतपदाची जबाबदारी स्वीकारली. मावळते महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या उपस्थितीत हा सोहळा साधेपणाने पार पडला. पण, कृष्णा महाराज कोण आणि निवृत्तीनंतर नामदेव महाराज शास्त्री पुढे काय करणार ?

सगळं सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा. मंडळी, मूळचे तेलंगणातील असलेले कृष्णा महाराजांनी एमएपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. ते १७ वर्षांपूर्वी भगवानगडावर आले.

मग ज्ञानेश्वरी विद्यापीठात बारा वर्षे ज्ञानेश्वरी आणि धार्मिक ग्रंथांचा अभ्यास केला. पुढे त्यांनी एकनाथवाडी येथील निरंजन संस्थानचे महंत म्हणूनही काम पाहिलं. दुसरीकडे, नामदेव शास्त्री यांनी सामाजिक जीवनातून निवृत्ती जाहीर केली आहे.

उर्वरित आयुष्य ते ज्ञानेश्वरीचा भावानुवाद लिहिण्यासाठी देणार आहेत. विशेष म्हणजे, भगवानगडावर यापुढे केवळ अध्यात्म, ज्ञानेश्वरीचा अभ्यास आणि प्रचार होईल. गड कोणत्याही राजकारणात सहभागी होणार नाही, असंही नामदेव शास्त्री यांनी स्पष्ट केलं. मंडळी, तुम्ही श्रीक्षेत्र भगवानगडावर आतापर्यंत किती वेळा गेला आहात? कमेंट मध्ये नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button