
मुंबईत गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये झालेल्या दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नेमक काय म्हटलंय ? जाणून घेऊयात. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो करायला विसरू नका.
मंडळी, राज्यात दुष्काळाचं संकट असताना शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असं आश्वासन शिंदेंनी दिलंय. पण त्यांच्या भाषणातील सर्वाधिक चर्चेची घोषणा होती ती शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नाबाबत!
शेतकरी कुटुंबातील मुलीचं लग्न असेल, तर तिच्या विवाहाची जबाबदारी शिवसेना घेणार असल्याचं शिंदे म्हणाले. यासाठी राज्यात सामूहिक विवाह सोहळे आयोजित केले जाणार आहेत.
एवढंच नाही, तर लग्नासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलींची यादी तयार करण्याचे निर्देशही त्यांनी शिवसेनेच्या खासदार आणि आमदारांना दिले. यावेळी शिंदेंनी शेतकऱ्यांना दिवाळीचा शिधा देण्याचाही उल्लेख केला.
तसेच परभणीत २५ हजार शिलाई मशिन आणि शेतकऱ्यांच्या मुलींसाठी २५ हजार सायकली वाटपाच्या योजनेचा उल्लेख केला. पण, या घोषणेचा शेतकरी कुटुंबांना किती फायदा होईल ? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.





