Latest

अहिल्यानगर जिल्ह्यात पाण्याचं आतापर्यंतच सर्वात मोठं संकट ! ‘या’ २६३ गावांच्या विहिरी कोरड्या, हजार टँकरची वेळ येणार ?

अहिल्यानगर जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यातच पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. अजून उन्हाळा सुरूही झालेला नाही, तोच तब्बल २६३ गावांच्या विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत! नेमकी परिस्थिती किती गंभीर आहे? जाणून घेऊयात पण त्याआधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधील ५ लाख ३० हजार ७९४ नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या ३१० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, पाथर्डी तालुक्याला सर्वाधिक झळ बसली आहे. यंदा जुलै वगळता ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये पावसाने मोठी दडी मारली. परिणामी सप्टेंबरमध्ये भूजलपातळी सरासरी तीन मीटरने खाली गेली.

खरीप पिकांचं नुकसान झालं, तर रब्बी हंगामही धोक्यात आला आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारीनंतर पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता असून, टँकरची संख्या हजाराच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. यासाठी तब्बल ४७५ कोटींचा टंचाई कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. तर मग मंडळी तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button