
आता देशात प्लास्टिकच्या दहा आणि वीस रुपयांच्या नोटा चलनात येणार आहेत. RBI ने यासाठी मोठी तयारी सुरु केली आहे. नेमकी कशी आहे RBI ची प्लॅनिंग? सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.
मंडळी, भारतीय रिझर्व्ह बँक पहिल्या टप्प्यात १० आणि २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा चलनात आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी विशेष पॉलिमर शीट्स खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
विशेष म्हणजे, या नोटांच्या चाचण्या १ एप्रिल २०२७ पासून सुरू होण्याची शक्यता आहे. या नोटांचा आकार सध्याच्या कागदी नोटांसारखाच ठेवला जाणार आहे. त्यामुळे एटीएम मशीनमध्येही बदल करण्याची गरज पडणार नाही.
या प्लास्टिक नोटांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या सध्याच्या कागदी नोटांपेक्षा चौपट जास्त टिकू शकतात. मात्र, सध्या या नोटा बाजारात येण्यापूर्वी चाचणीच्या टप्प्यात असतील. तर मग मंडळी तुम्हाला प्लास्टिकच्या नोटा आवडतील का? कमेंट करून नक्की सांगा!





