Latest

महाराष्ट्र सरकार मुलीच्या जन्मानंतर देणार 1 लाख रुपये…; ‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ कोणाला मिळतो ?

मुलगी जन्माला आली की तिच्या शिक्षणापासून ते भविष्यातील खर्चापर्यंत पालकांना अनेक चिंता असतात. पण आता या चिंतेला थोडा आधार मिळणार आहे. कारण महाराष्ट्र सरकारच्या ‘लेक लाडकी’ योजनेतून पात्र मुलींना तब्बल १ लाख १ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. नेमकी ही योजना काय आहे आणि पैसे कधी मिळतात? सांगतो. आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

मंडळी, या योजनेअंतर्गत १ एप्रिल २०२३ किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींना टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत दिली जाते. मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, पहिलीत प्रवेश घेतल्यावर ६ हजार, सहावीत ७ हजार आणि अकरावीत प्रवेश घेतल्यावर ८ हजार रुपये दिले जातात. तर वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार रुपये मिळतात.

मात्र, यासाठी कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असणे, पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड असणे आणि शासनाच्या उत्पन्नासह इतर पात्रता अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे आता महाडीबीटी २.० पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. तर मग मंडळी तुम्हाला ही योजना आधीपासूनच माहिती होती का कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button