Latest

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पुन्हा सोधा पॅटर्न ! व्याही-व्याही बिनविरोधच्या वाटेवर ! गडाख-घुले परिवाराचा सहकारात पुन्हा दबदबा ?

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकीय समीकरणांपेक्षा आता नात्यांची चर्चा रंगलीय! मंडळी, नेवासा सोसायटी मतदारसंघातून माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित झाली आहे.

विशेष म्हणजे, गडाख यांचे व्याही आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले किंवा त्यांच्या पत्नी राजश्रीताई घुले यांची सुद्धा बिनविरोधच्या वाटेवर आहेत. त्यामुळे सध्या जिल्ह्यात दोन्ही व्याही चर्चेत आले आहेत.

दरम्यान शेवगाव सोसायटी मतदारसंघात दहा वर्षांच्या संचालकपदाच्या नियमाचा अडसर आल्यास चंद्रशेखर घुले यांच्या ऐवजी राजश्रीताई घुले यांना शेवगावातून संधी मिळण्याची शक्यता आहे.

म्हणजेच एका बाजूला गडाखांचा बिनविरोध प्रवेश जवळपास पक्का आहे… तर दुसऱ्या बाजूला घुले परिवारही बिनविरोधच्या वाटेवर आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ‘व्याही-व्याही’ बिनविरोधचा फॉर्म्युला जुळतोय का? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button