Latest

सर्वसामान्यांसाठी चिंताजनक ! होम लोनचा हफ्ता थेट तीन हजार रुपयांनी वाढणार….कारण काय ?

घर घेण्याचा विचार करत असाल किंवा गृहकर्ज फेडत असाल, तर आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे.
मंडळी, RBI ने रेपोदर ५.२५ टक्क्यांवरून ५.५० टक्के केला आहे.

त्यामुळे गृहकर्जाच्या व्याजदरातही ०.२५ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी कर्जदारांच्या मासिक EMI वर थेट परिणाम होणार आहे.

उदाहरणार्थ, २० वर्षांसाठी २५ लाख रुपयांचे कर्ज असल्यास EMI सुमारे ३८० रुपयांनी वाढून २०,१३९ रुपयांपर्यंत जाऊ शकतो. ५० लाखांच्या कर्जासाठी EMI सुमारे ७६० रुपयांनी, तर १ कोटींच्या कर्जासाठी सुमारे १,५२१ रुपयांनी वाढू शकतो.

दोन कोटींच्या गृहकर्जावर ही वाढ तब्बल ३,०४३ रुपयांपर्यंत जाऊ शकते. म्हणजेच रेपोदरातील पाव टक्क्यांची वाढही गृहकर्जदारांच्या मासिक बजेटवर मोठा परिणाम करणारी ठरू शकते. नव्याने घर घेणाऱ्यांसाठीही कर्जाचा खर्च वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button