
पत्नीच्या मृत्यूनंतर एका शिक्षकाला तब्बल साडेसात वर्षं निलंबित ठेवलं, पण आता उच्च न्यायालयाने या प्रकरणात महत्त्वाचा निर्णय दिलाय ! अहिल्यानगर जिल्ह्यातील शिक्षक विश्वास रंगनाथ गायकवाड यांचं निलंबन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केलंय. नेमकं काय आहे प्रकरण? सांगतो. त्याआधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी, गायकवाड यांच्या पत्नीचं २०१८ मध्ये संशयास्पद परिस्थितीत निधन झालं. या प्रकरणात त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला. अटकेनंतर त्यांना निलंबित करण्यात आलं. मात्र, विभागीय चौकशी अहवालात त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नसल्याचं समोर आलं.
तसंच, कुटुंबीयांनीही गैरसमजातून तक्रार झाल्याचं न्यायालयाला सांगितलं. फौजदारी खटला प्रलंबित असल्यामुळे निर्णय घेता येणार नाही, असा प्रशासनाचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला नाही. केवळ खटला सुरू आहे म्हणून कर्मचाऱ्याला अनिश्चित काळासाठी निलंबित ठेवणं अन्यायकारक असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं.
शिवाय, पूर्ण मागील वेतन, थकबाकी आणि इतर सेवाविषयक लाभ देण्याचे आदेशही दिले. तुम्हाला काय वाटतं? अशा प्रकरणांमध्ये कर्मचाऱ्यांना वेळेत न्याय मिळायला हवा का? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा.





