
दुष्काळामुळे यंदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांपुढे दुहेरी संकट उभ राहिल आहे. आधीच दुष्काळाने उत्पादनात घट झाली आहे आणि आता ऊस गाळप लवकर सुरू झाल्याचाही फटका शेतकऱ्यांना बसतोय. गाळप लवकर सुरु झाल्याने शेतकऱ्यांना नेमकं काय नुकसान सहन करावं लागतंय? सांगतो. आधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी, सरकारने १५ ऑक्टोबरपासून गाळपाला परवानगी दिली आणि कारखान्यांची धावपळ सुरू झाली. पण या घाईचा फटका शेतकऱ्यांच्या खिशाला बसण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी अहिल्यानगर जिल्ह्यात उसाचा सरासरी उतारा १० ते ११ टक्के होता.
यंदा मात्र तो घसरून ७ ते ८ टक्क्यांवर आलाय. म्हणजेच कमी उसातून कमी साखर तयार होणार. त्यामुळे कारखाने दर जाहीर करण्याबाबत अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. दुसरीकडे, विहिरींनी तळ गाठलाय.
पाणी नसल्यामुळे ऊस वाळण्याची आणि वजन घटण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकरी नाइलाजाने मुदतीआधीच ऊस तोडून देत आहेत. शेतकरी संघटनांनी प्रतिटन ५ हजार रुपये दराची मागणी केलीय. तुमच्या मते, शेतकऱ्यांना योग्य दर मिळणार का ? कमेंट करून सांगा.





