
मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे ! अहिल्यानगर जिल्ह्यातील काही तालुक्यात हमीभाव खरेदी केंद्र सुरु होणार आहे. कधी आणि कुठे सुरु होणार केंद्र ? सांगतो. आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी, राज्य पणन महासंघाच्या माध्यमातून १ नोव्हेंबरपासून पाथर्डी आणि राहुरी तालुक्यात मका हमीभाव खरेदी केंद्र सुरू होणार आहे. या योजनेअंतर्गत मक्याला प्रतिक्विंटल २ हजार ४१० रुपये किमान आधारभूत दर निश्चित करण्यात आला आहे. पण लक्षात ठेवा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करावी लागणार आहे.
नोंदणीसाठी पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीतील अकोला परिसर सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क साधा. सोबत आधार कार्ड, सातबारा, आठ-अ उतारा, चालू हंगामातील पीकपेरा नोंद, बँक पासबुक आणि आधारशी जोडलेला मोबाइल क्रमांक ठेवा.
नोंदणी बायोमेट्रिक पद्धतीने होणार असल्याने स्वतः उपस्थित राहणं आवश्यक आहे. तर मग मंडळी, तुम्ही नोंदणी करणार आहात का? कमेंटमध्ये नक्की सांगा.





