
दुष्काळाने संकटात सापडलेल्या अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता ज्वारीचे बियाणे मोफत मिळणार आहे. नेमका कसाय कृषी विभागाचा प्लॅन? सविस्तर सांगतो. पण आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी, राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानांतर्गत जिल्ह्यात तब्बल २१ हजार २० ज्वारी मिनिकिट्स मोफत वितरित करण्यात येणार आहेत.
विशेष म्हणजे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या ‘फुले यशोमती’ या ज्वारी वाणाचा यात समावेश आहे. हे वाण कमी पावसाच्या आणि कोरडवाहू भागांसाठी उपयुक्त ठरू शकतं. प्रत्येक मिनिकिट चार किलोच्या पॅकिंगमध्ये मिळणार असून, एका एकर क्षेत्रासाठी त्याचं वितरण करण्यात येणार आहे.
या ज्वारी वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे कमी पाण्यात लवकर पक्व होण्याची क्षमता. शिवाय जनावरांसाठी चारा म्हणून उपयोगी असलेल्या कडब्याचं उत्पादनही यातून मिळू शकतं.
या जातीपासून अनुकूल परिस्थितीत हेक्टरी ४० ते ५० क्विंटल कडबा उत्पादन मिळत आहे. तर मग मंडळी, तुम्ही यंदा रब्बी ज्वारीची पेरणी करणार आहात का? कमेंटमध्ये सांगा.





