Latest

बेलापूर-परळी रेल्वेमार्गाबाबत सर्वात मोठी अपडेट…. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवांनी थेट पत्रच पाठवलं ! मंजुरी कधी मिळणार ?

वर्षानुवर्षे रखडलेल्या बेलापूर-परळी रेल्वेमार्गाबाबत आता पुन्हा एक मोठी घडामोड समोर आली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पत्र देत, या रेल्वेमार्गाची तपासणी सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले आहे.

बेलापूर-परळी रेल्वेमार्गाचा प्रस्ताव २०२२ पासून रेल्वे बोर्डाकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. या मार्गाला मंजुरी मिळावी यासाठी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. दुसरीकडे बेलापूर-परळी रेल्वे कृती समितीनेही आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

फेब्रुवारीत १३ दिवसांचे उपोषण, त्यानंतर मंत्रालयासमोर आंदोलन करण्यात आले. आता रेल्वेमंत्र्यांच्या पत्रामुळे या मार्गाच्या मंजुरीच्या आशा पुन्हा जाग्या झाल्या आहेत. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रस्तावित बैठक अद्याप झालेली नाही. त्यामुळे पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button