
शेतकरी मित्रांनो, सोयाबीन विकण्याचा विचार करताय? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे ! कारण अवघ्या आठ दिवसांत सोयाबीनच्या दरात क्विंटलमागे तब्बल ११०० रुपयांची वाढ झालीय. पण सोयाबीनला कुठे मिळतोय एवढा विक्रमी भाव ? सांगतो, त्याआधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी सांगलीच्या मार्केटमध्ये सोयाबीनचा कमाल दर ७ हजार ३०० रुपयांपर्यंत पोहोचलाय. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या चार वर्षांतील हा उच्चांकी दर आहे.
२१ ऑक्टोबरला सोयाबीनला क्विंटलमागे ६ हजार ४०० रुपये मिळत होते. मात्र, २७ ऑक्टोबरला हाच कमाल दर ७ हजार ३०० रुपयांवर पोहोचला. मग दरवाढीमागचं कारण काय? दुष्काळामुळे उत्पादनात घट, बाजारातील कमी आवक, पशुखाद्याची वाढती मागणी आणि तेलाच्या दरातील वाढ यामुळे सोयाबीनला तेजी मिळाल्याचं सांगितलं जातंय.
देशात सोयाबीन उत्पादनात ७ टक्के, तर महाराष्ट्रात २० टक्के घट झाल्याचा अंदाजही सांगितला जातोय. पण लक्षात ठेवा, प्रत्येक बाजार समितीत दर वेगवेगळे असू शकतात. सोयाबीन विकण्याआधी आपल्या बाजारभावाची खात्री करा. तर मग मंडळी तुमच्या भागात आज काय दर मिळतोय? कमेंट करून नक्की सांगा!





