Latest

अहिल्यानगरमध्ये कांदा बाजार भावात मोठी घसरण…‘या’ मार्केटमध्ये कांद्याचा भाव ४ हजाराच्या खाली!

अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांसाठी एक चिंतेची बातमी आहे. ती म्हणजे जिल्ह्यात कांदा बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. कांद्याला अहिल्यानगरमध्ये नेमका काय भाव मिळतोय ? चला जाणून घेऊया, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.

मंडळी, जिल्ह्यातील राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी कांद्याला सर्वाधिक ४ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. बाजारात कांद्याच्या ३ हजार ६५२ गोण्यांची आवक झाली.

पहिल्या प्रतिच्या कांद्याला ३ हजार १०० ते ४ हजार २००, दुसऱ्या प्रतिला २ हजार ते ३ हजार ५० रुपये, तर तिसऱ्या प्रतिला १ हजार ते १ हजार ९५० रुपये भाव मिळाला.

दुसरीकडे, सोयाबीननेही शेतकऱ्यांचे लक्ष वेधले. सोयाबीनला ७ हजार ४०१ ते ७ हजार ५२५ रुपये, तर सरासरी ७ हजार ४६५ रुपये भाव मिळाला.

डाळिंबाला १७५ रुपयांपर्यंत, तर मक्याला सरासरी २ हजार ८०० रुपये भाव मिळाला. पेरूला ३८ रुपये प्रतिकिलोपर्यंत दर मिळाला. तर मग मंडळी तुमच्या जवळच्या मार्केटमध्ये कांद्याचे भाव कसे आहेत? कमेंटमध्ये नक्की सांगा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button