नगर जिल्ह्यात, अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्याचे प्रकार वाढले. अकोले तालुक्यात तर, एकाच गावातील तब्बल 55 अल्पवयीन मुली गरोदर असल्याचा प्रकारही उघडकीस आला. विशेष म्हणजे, जिल्ह्यात गेल्या वर्षभरात दाखल झालेल्या अत्याचाराच्या अनेक गुन्ह्यांतील आरोपी, हे एका विशिष्ट समाजातील असल्याचे निदर्शनास आले. आता श्रीरामपूरमध्ये यापेक्षा जरा वेगळा प्रकार उघडकीस आला. एका अल्पवयीन मुलावरच सामुहिक अनैसर्गीक अत्याचार करण्यात आला. शिवाय हा प्रकार वारंवार करुन त्या अनैसर्गीक कृत्याचा व्हिडीओही काढण्यात आला.
हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत, त्या अल्पवयीन मुलाकडून वाट्टेल ते काम करुन घेण्याचा प्रकारही आरोपींनी केला. अखेर या प्रकरणाला वाचा फुटली आणि पोलिसांनी श्रीरामपूर शहर पोलिसांत पाच जणांविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. हे सगळं अतिगंभीर आहे. अल्पवयीन मुलींसह आता अल्पवयीन मुलांसोबतही आता अनैसर्गीक अत्याचाराचे प्रकार होऊ लागल्याने पालकांची चिंता वाढली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यासह जिल्ह्यात बाल लैंगिक अत्याचार आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. एकट्या नगर जिल्ह्यात वर्षभरात 50 पेक्षा जास्त गुन्हे दाखल झालेत. ऑक्टोबर 2024 साली नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये यापेक्षा वेगळी घटना घडली होती. तेथे अल्पवयीन मुलीवर नाही, तर अल्पवयीन मुलावर सामुहिक लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. अल्पवयीन मुलावर 9 मुलांनी अनैसर्गीक अत्याचार केला होता.
हा प्रकार एवढा गंभीर होता की, मुलाला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. विशेष म्हणजे ज्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाला त्यातील काही आरोपीही अल्पवयीनच होते. पिडीत मुलाच्या आईच्या लक्षात ही गोष्ट आल्यावर तिने थेट पोलिसांत धाव घेत, हा सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत, सर्व 9 आरोपींना ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलावर अनैसर्गीक अत्याचार झाल्याने श्रीरामपूरमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. परंतु त्यानंतरही हे असे घाणेरडे प्रकार सुरुच राहिले.
श्रीरामपूरमध्ये मंगळवारी पुन्हा असाच एक प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे, या अल्पवयीन मुलासोबत 2024 पासून अनैसर्गीक अत्याचार केला जात होता. परंतु त्याला धमकीच अशी दिली होती की, पिडीत मुलाला त्याचे तोंड बंद ठेवावे लागले होते. विशेष म्हणजे, मैत्री करुन या मुलावर अत्याचार केला जात होता. श्रीरामपूर शहरात दाखल फिर्यादीत काही धक्कादायक बाबी नमूद आहेत. फिर्यादीनुसार, पिडीत हा अल्पवयीन आहे. त्याच्याशी 2024 सालापासून संशयीत आरोपी सलमान सलीम इराणी व अलीअब्बास सलीम इराणी (दोघेही रा. श्रीरामपूर) यांनी मैत्री केली.
मैत्रीचे रुपांतर अनैसर्गीक संबंधात केले. हे दोघेही या पिडीत मुलाला घेऊन जात आणि त्याच्यावर बळजबरी अनैसर्गीक अत्याचार करत. हे प्रकार वाढल्यानंतर हा अल्पवयीन मुलगा, हे सगळं करण्यास नकार देऊ लागल्याने या दोन्ही संशयीत आरोपींनी, त्याच्यावर केलेल्या अनैसर्गीक अत्याचाराचा व्हिडीओ, गुपचूप शूट केला. तोच व्हिडीओत पिडीत मुलाला दाखवून त्याला तो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर ब्लॅकमेल करुन अत्याचार करण्याचे प्रकार वाढले.
त्याच दरम्यान, पिडीत मुलाच्या एका नातेवाईक मुलीने याच संशयीत आरोपींविरोधात श्रीरामपूर पोलिसांत एक तक्रार दाखल केली. त्या तक्रारीतील फिर्यादी ही याच पिडीत अल्पवयीन मुलाची जवळची नातेवाईक होती. त्यानंतर या संशयीत आरोपींनी या मुलाला ती तक्रार मागे घेण्यासाठी मध्यस्थी करण्याचा दबाव टाकला. फिर्यादी मुलगी ही तुझी नातेवाईक आहे, तिला तक्रार मागे घ्यायला लाव नाहीतर तुझे व्हिडीओ आम्ही व्हायरल करु.. अशी थेट धमकी त्या मुलाला देण्यात येऊ लागली.
या सगळ्या प्रकारात सलीम नुरअली इराणी, रहीम मिर्झा, मरियम हैदर इराणी हेही सहभागी होते. त्यानंतर याच आरोपींनी या मुलावरील अनैसर्गीक अत्याचाराचे व्हिडीओ व्हायरलही केले. या पिडीत अल्पवयीन मुलाची समाजात बदनामी केली. त्यानंतर मात्र या पिडीत मुलाच्या कुटुंबाने हा सगळा प्रकार समजून घेतला. त्यानंतर थेट पोलिस ठाणे गाठले गेले. तेथे या पाच संशयीत आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम 115(2), 351(2), 352, 3(5) तसेच पॉक्सो कायदा कलम 4, 6 व 11 अन्वये गुन्हा दाखल केला.
हे सगळं गंभीर होतं. श्रीरामपूरमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार घडले आहेत. आता अल्पवयीन मुलांवरही अनैसर्गीक अत्याचार होण्याचे प्रकार समोर येऊ लागल्याने पालकांची चिंता वाढली आहे.





