Latest

“मी एक रुपया घेतला असं दाखवा, उद्या सकाळीच फाशी घेतो, नाही घेतली तर दोन बापाची औलाद ” मनोज जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल

मी पैशाने, पदाने फुटत नाही. मला कोणी दाखवून द्यावं की मी एक रुपया घेतला, मी उद्या सकाळी फाशी घेतो, नाही घेतली तर दोन बापाची औलाद ! हे वाक्य आहे मनोज जरांगे पाटील यांच.

मंडळी, भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अंतरावली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीत मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न आणि आंदोलनावेळी झालेल्या लाठीचार्जवर चर्चा झाली.

मनोज जरांगे यांनी सरकारवर गंभीर आरोप करत सांगितले की, राज्यातील तब्बल ८० हजार मराठा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अडकली असून सुमारे ६०० कोटी रुपये थकले आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे सिबील स्कोअर खराब झाल्याचा दावाही त्यांनी केला.

यावेळी त्यांनी शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त केली. लाठीचार्ज प्रकरणावर बोलताना जरांगे भावूक झाले. “आमच्या आई-बहिणींना मारलं, मुलींना गोळ्या लागल्या, मग आम्ही प्रश्न विचारू नये का?”

असा सवाल त्यांनी केला. तसंच, “मी पैशाने फुटत नाही. सरकारने एक रुपया दिल्याचा पुरावा द्यावा, मी उद्या फाशी घेतो,” असं थेट आव्हानही त्यांनी दिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button