Latest

अहिल्यानगरमध्ये भीषण पाणीटंचाई ! ऑक्टोबरमध्येच २०७ टँकर सुरू, मार्चपर्यंत कशी असणार स्थिती ?

अहिल्यानगर जिल्ह्यात पाणीटंचाईचं संकट दिवसेंदिवस गंभीर होत चाललंय ! अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. मग मार्चमध्ये परिस्थिती कशी असणार ? चला समजून घेऊया. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

मंडळी, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या २६ ऑक्टोबरच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील १९६ गावं आणि १ हजार ११४ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय. सध्या तब्बल २०७ टँकर सुरू आहेत.

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे विहिरी आणि इतर जलस्रोत आटू लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय.

प्रशासनाने पाणी उपलब्ध करण्यासाठी आतापर्यंत ३६ विहिरी, बोअर आणि इतर जलस्रोत अधिग्रहित केले आहेत. यामध्ये जामखेडमधील १० आणि पारनेरमधील ७ विहिरींचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, जिल्ह्यातील टँकरची संख्या मार्चअखेर ४०० पर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर १६ लाख पशुधनासाठी चारा उपलब्ध करण्याचंही मोठं आव्हान आहे. तुमच्या गावात पाणीटंचाईची परिस्थिती काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button