Explained

Satyajeet Tambe | ‘संगमनेर 2.0’ पहिल्या 100 दिवसांचा लेखाजोखा काय?

राजकारणात नुसतं व्हिजन असून चालत नाही, तर इफेक्टही लागतो. म्हणजे, किमान प्रभाव रहावा, असं व्यक्तिमत्व लागतं. आ. सत्यजित तांबे यांच्याकडे हे दोन्हीही असल्याचं, सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवरुन दिसतं. विधानसभेला मामाचा पराभव झाल्यावर, या तरुण नेत्यानं संगमनेरचं राजकारण हातात घेतलं. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा साडेतीन दशकांत पहिल्यांदाच पराभव झाला होता. त्यानंतर लगेच नगरपालिकेची निवडणूक लागली. गेल्या 35 वर्षांपासून हातात असलेली संगमनेर नगरपालिकाही हातातून जाईल, अशी स्थिती त्यावेळी होती. परंतु या पठ्ठ्यानं एकट्यानं गड लढला आणि जिंकला. संगमनेर पालिका हातात घेण्यासाठी कल्पकतेनं संगमनेर 2.0 सादर केलं. संगमनेरचा विकास व नियोजन त्यात मांडलं. आ. सत्यजित तांबे यांच्या याच व्हिजनला संगमनेरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि पालिका पुन्हा त्यांच्याच ताब्यात दिली. संगमनेर पालिका हातात सत्ता मिळवून 100 दिवस पूर्ण झाले. याच शंभर दिवसांत संगमनेर पालिकेनं काय-काय केलं, याचा लेखाजोखा आ. तांबेंनी शुक्रवारी मांडला. आ. तांबे यांच्या या वचनपूर्तीची सध्या संगमनेरमध्ये चांगलीच चर्चा सुरु झालीय. संगमनेरमध्ये आता सत्यजित युग सुरु झालंय, हे गेल्या काही दिवसांतील राजकीय घटनांतून दिसू लागलंय. सत्यजित नावाचं हेच रसायण आज आपण समजून घेऊयात…

संगमनेर पालिकेच्या पदग्रहणाला आता जवळपास 110 दिवस उलटलेत. पालिका निवडणुकीपूर्वी आ. सत्यजित तांबे यांनी ही निवडणूक हातात घेऊन शहराचा 100 दिवसांचा आराखडा मांडला होता. संगमनेर 2.0 नावानं संगमनेरसाठीच्या भविष्यातील काही योजना मांडल्या होत्या. यापैकी कोणत्या योजना संगमनेर सेवा समितीने पूर्ण केल्या, हे सांगण्यासाठी आ. सत्यजित तांबे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत सेवा समितीची भूमिका मांडली. आ. सत्यजीत तांबे यांनी या पत्रकार परिषदेत संगमनेरच्या विकासाचा लेखाजोखा मांडला. ते म्हणाले की…

– शहराच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष केंद्रित करून कचरा व्यवस्थापन आणि मुख्य चौक सुशोभीकरणाचे प्रकल्प हाती घेतले.
– शहरातील माता-भगिनींच्या सुरक्षिततेसाठी रक्षक दल ची स्थापना केली. या रक्षक दल च्या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत असून रक्षक दलातील जवान महिलांच्या सुरक्षेसाठी कायम तत्पर आहेत.
– नागरिकांना तक्रारीसाठी थेट WhatsApp नंबर उपलब्ध करून दिला.
– महिलांच्या सुविधेसाठी शहराच्या विविध भागात ई- टॉयलेट्स बसविले
– अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठ्याची कामे गतीने पूर्ण करून शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यावर भर दिला.
– पावसाळ्यापूर्वी आणि नंतर खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती तसेच नवीन सिमेंट कॉंक्रिट रस्त्यांचे नियोजन पूर्ण केले.
– कामकाजात आधुनिकता आणून सर्व दाखले आणि सेवा नागरिकांना वेळेत मिळतील, अशी व्यवस्था निर्माण केली.
– शहराच्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि रस्ते मोकळे करण्यासाठी अतिक्रमण काढण्याची मोहीम धडाक्याने राबवली.
– नगरपरिषदेत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे काम वेळेत व्हावे आणि प्रशासनात पारदर्शकता राहावी यासाठी डिजिटल प्रणालीचा वापर वाढवला.

सुरुवातीचे पहिले 100 दिवस ही केवळ सुरुवात आहे. संगमनेरला ‘स्मार्ट’, ‘सुरक्षित’ आणि ‘सक्षम’ शहर बनवण्याचा संकल्प यापुढेही कायम राहील, असं आ. सत्यजित तांबे यांनी या पत्रकार परिषदेत सांगून टाकलं. खरं तर, दिलेल्या शब्दाला जाणारा युवा नेता म्हणून सत्यजित तांबे राज्यभर चर्चेत असतात. पदवीधर मतदारसंघाचा आमदार म्हणून त्यांनी विधानपरिषदेत आपली एक वेगळी ओळख तयार केलीय. शंभर टक्के उपस्थित राहणारा आमदार म्हणून त्यांची ख्याती आहे. शिवाय आत्तापर्यंत जेवढी अधिवेशने झाली त्या सगळ्यात आपली वेगळी छाप त्यांनी तयार केली. शेतकरी, युवक, बेरोजगार, डाँक्टर, वकील, इंजिनिअर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शासकीय कर्मचारी, पत्रकार अशा सगळ्यांच्या प्रश्नांला त्यांनी वाचा फोडली. आ. सत्यजित तांबे यांच्या आभ्यासपूर्ण भाषनांनी प्रत्येक अधिवेशन गाजले. आ. तांबे यांच्याकडील व्हिजन व नियोजनामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे अपक्ष आमदार म्हणून सत्यजित तांबे चर्चेत राहिले. महायुतीत असणाऱ्या आ. अमोल खताळ यांच्यापेक्षाही मुख्यमंत्र्‍यांच्या जवळचा अपक्ष नेता म्हणून सत्यजित तांबे प्रसिद्ध झाले.

आमदार म्हणून धुळे, नंदूरबार, जळगाव, नगर आणि नाशिक या जिल्ह्यात तांबेंनी लोकप्रियता मिळवली. आता संगमनेर पालिकेच्या पहिल्या 100 दिवसांत आ. तांबे यांनी संगमनेरकरांची मने जिंकलीत. पुढच्या काही वर्षात नगर जिल्ह्यातील सक्रीय राजकारण ते हाताळतील, असेही संगमनेर सेवा समितीला वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button