Latest

भोंदू खरात आता शिर्डी पोलिसांच्या ताब्यात ! अहिल्यानगरमधील पुढारी होते संपर्कात; आता सगळं समोर येणार

भोंदू अशोक खरात अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे आणि आता या प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मंडळी, नाशिक येथील अशोक खरात याला शिर्डी पोलिसांनी आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलं आहे. सोमवारी दुपारी त्याला ताब्यात घेऊन शिर्डीला आणण्यात आलं असून, मंगळवारी राहाता न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

खरातविरोधात शिर्डीत दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. एक म्हणजे जमीन घोटाळा आणि दुसरा म्हणजे पतसंस्थेत बनावट खाती उघडून आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप. या प्रकरणात त्याची पत्नी कल्पना खरात आणि इतर काही जणांचाही समावेश आहे.

दरम्यान, या प्रकरणात आणखी एक मोठी चर्चा रंगू लागली आहे ती म्हणजे अहिल्यानगरमधील काही राजकीय पुढाऱ्यांचा खरातशी संपर्क होता का? पोलिस तपासात खरातचे अनेक कारनामे उघड झाले असून, काही स्थानिक नेते त्याच्या संपर्कात होते, अशी चर्चा आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.

आता खरातचा पुढील काही दिवस शिर्डी पोलिसांच्या कोठडीत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात आणखी धक्कादायक माहिती समोर येऊ शकते. आता खरंच कोण-कोण या प्रकरणात अडकणार? आणि पुढे काय खुलासे होणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button