Latest

अहिल्यानगर ब्रेकिंग ! विजयी जल्लोष करताना भाजप कार्यकर्त्यांत कपडे फाडेपर्यंत हाणामारी, जिल्हाध्यक्षांसमोरच..

अहिल्यानगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.. विजयी जल्लोष करताना भाजप कार्यकर्त्यांमध्येच जोरदार हाणामारी झाली आणि हा वाद थेट कपडे फाडेपर्यंत गेला!

मंडळी, पश्चिम बंगालसह इतर निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या विजयाचा जल्लोष शहरात सुरू होता. शहर भाजपाच्या वतीने भिंगारवाला चौक आणि लक्ष्मी कारंजा परिसरात फटाके वाजवून आणि पेढे वाटून आनंद साजरा केला जात होता.

मात्र याच जल्लोषात अचानक वातावरण बदललं.. पेढा नेमका कुणाला भरवायचा, या किरकोळ कारणावरून दोन पदाधिकाऱ्यांमध्ये वाद सुरू झाला आणि काही क्षणांतच हा वाद थेट हाणामारीत बदलला. धक्कादायक म्हणजे, ही सगळी घटना शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या समोरच घडली.

शेवटी ज्येष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप करून दोघांना कशीबशी समजावलं आणि प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत जाण्यापासून थांबवलं.
पण या घटनेमुळे एक मोठा मुद्दा पुन्हा समोर आला आहे.. शहर भाजपमध्ये जुने आणि नवे कार्यकर्ते यांच्यातील संघर्ष.

गेल्या काही दिवसांपासून हा वाद वाढत चालला असून, अनेक कार्यक्रमांमध्ये जुने पदाधिकारी दिसत नसल्याची चर्चा आहे. यावरून भाजपमधील जुने व नवे संघर्ष किती टोकाला गेला आहे, याची कल्पना येते. वरिष्ठ नेत्यांकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button