
अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली आणि आता माणसांसोबतच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, या संकटावर मात करण्यासाठी राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने मोठं पाऊल उचललं आहे. कृषी विद्यापीठाचा नेमका निर्णय काय? जाणून घेऊयात. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी, विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्रक्षेत्रावर तब्बल १०० एकर क्षेत्रात हिरवा चारा उत्पादनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी ज्वारीच्या ‘फुले गोधन’ या खास वाणाची लागवड करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, या वाणापासून एका हेक्टरमध्ये तब्बल ४५ ते ५० टन हिरवा चारा मिळू शकतो. हा चारा पचायला हलका, चवीला गोड आणि पौष्टिक असल्याने जनावरांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी चारा टंचाईचा प्रश्न पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मांडला होता. त्यानंतर या उपक्रमाला गती मिळाली. तर मग मंडळी तुम्हाला विद्यापीठाचा हा निर्णय कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.





