Latest

आवक घटली तरी बाजारभावात घसरण ! अहिल्यानगरच्या ‘या’ मार्केटमध्ये कांद्याचे भाव ४५०० रुपयांवर

शेतकऱ्यांसाठी चिंतेची बातमी आहे. कांद्याचे भाव आवक कमी असतानाही घसरत आहेत. पण नेमकं कारण काय ? सांगतो. पण, त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा. मंडळी, अहिल्यानगरच्या नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उपआवारात बाजारभावात मोठी घसरण दिसली.

इथे एक नंबर कांद्याला प्रति क्विंटल तब्बल ४ हजार ५०० रुपये भाव मिळाला. मात्र, दुसरीकडे कांद्याची आवक तब्बल ८५ टक्क्यांनी घटली. या लिलावात एकूण १६ हजार २९२ गोण्यांची आवक नोंदवण्यात आली. आता कांद्याचे वेगवेगळे भावही समजून घ्या.

एक नंबर कांद्याला ४० ते ४५ रुपये, दोन नंबर कांद्याला ३५ ते ४० रुपये, तर गोल्टी कांद्याला २५ ते ३५ रुपये किलोपर्यंत भाव मिळतोय. खराब कांद्याला मात्र केवळ १० ते १८ रुपये किलो भाव मिळतोय.

दक्षिण भारतात नवीन लाल कांद्याची आवक वाढल्यामुळे जुन्या कांद्याची मागणी मंदावली आहे. त्यामुळे कांद्याच्या दरवाढीलाही सध्या ब्रेक लागलाय. पण तुमच्या भागात कांद्याला किती भाव मिळतोय ? कमेंट करून नक्की सांगा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button