Latest

४ लाख देऊन लग्न केलं… महिनाभरातचं मुंबईच्या नवरीचं गुपित उघडलं ! अख्ख्या जिल्ह्यात रंगली चर्चा

लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याचा फायदा घेत एका तरुणाची तब्बल ४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार राहुरी तालुक्यात समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका महिला एजंटने राहुरीतील तरुणाला मुंबईची तरुणी दाखवली. लग्नासाठी तरुणाच्या कुटुंबाकडून ४ लाख रुपये रोख घेतल्यानंतर महिनाभरापूर्वी दोघांचा विवाह झाला. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू होतं.

मात्र, नववधूच्या संशयास्पद हालचाली आणि दारू-गुटख्याच्या व्यसनामुळे कुटुंबीयांना संशय आला. नातेवाईकांनी चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. ही तरुणी आधीच विवाहित असून तिला चार मुले असल्याचे समोर आल्याचा दावा करण्यात आला.

एवढंच नाही, तर जाब विचारल्यानंतर तिने ‘माझा आणि माझ्या चार मुलांचा सांभाळ करा,’ अशी मागणी केल्याचेही सांगण्यात आले. प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. नवरदेव आणि नातेवाईकांनी संबंधितांना पोलिसांच्या ताब्यात दिले.

मात्र, दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांमध्ये समेट झाल्याने शनिवारी रात्रीपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. या घटनेमुळे लग्नाच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित फसवणुकीच्या प्रकारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button