Latest

आंदोलनापूर्वी सामान्य परिस्थिती, नंतर कोट्यवधींची संपत्ती? जरांगेंच्या ‘या’ सहकाऱ्यांविरोधात अहिल्यानगरमधून थेट ईडीकडे तक्रार

नगरमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाशी संबंधित काही व्यक्तींच्या कथित संपत्ती आणि आर्थिक व्यवहारांवरून नवा वाद निर्माण झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते अजय महाराज बारस्कर आणि अमोल खुणे यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या मुंबई कार्यालयात तक्रार दाखल केली आहे.

मनोज जरांगे यांचे निकटवर्तीय पांडुरंग तारक, किशोर बंलाडे, गंगाधर काळकुटे, संजय कटारे आणि श्रीराम कुरणकर यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

पांडुरंग तारक यांनी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात सुमारे २८ एकर जमीन खरेदी केल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. या व्यवहारासाठी निधी कुठून आला, बँक खाती आणि आर्थिक स्रोत तपासावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडे आंदोलनानंतर महागड्या गाड्या, मोठ्या सभा आणि प्रवासासाठी निधी कुठून आला, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सरकारी विभागांमधून संबंधित कंपन्या किंवा नातेवाईकांना मिळालेल्या कंत्राटांचीही चौकशी करण्याची मागणी तक्रारीत आहे. हे सर्व आरोप असून, त्याची सत्यता तपासातूनच स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button