Latest

….तरच अहिल्यानगरच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ३४५० रुपयांचा दर मिळणार !

अहिल्यानगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे ! उसाला प्रतिटन ३७०० रुपये दर मिळावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश आलंय की तडजोड झालीय? चला जाणून घेऊया! पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

मंडळी, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कारखानदार आणि शेतकरी संघटनांची बैठक झाली. चर्चेच्या दोन फेऱ्यांनंतर संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रतिटन ३४५० रुपयांचा समान दर निश्चित करण्यात आला.

हा दर तीन टप्प्यांत मिळणार आहे. पहिली उचल म्हणून ३२५० रुपये, मार्च महिन्यात आणखी १०० रुपये आणि साखरेचे दर वर्षभर प्रतिकिलो ५० रुपये राहिल्यास पुढील गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी आणखी १०० रुपये दिले जाणार आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ३७०० रुपयांची मागणी केली होती. मात्र, कारखानदारांनी ती मान्य केली नाही. अखेर ३४५० रुपयांच्या निर्णयानंतर शेतकरी संघटनांनी आंदोलन स्थगित केलंय. तर मग मंडळी तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button